पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डेक्कन येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रेच आयोजन करण्यात आले होते. “ही पदयात्रा शहराच्या मुख्य रस्त्यावरुन आयोजित केल्याने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जाव लागलं” असा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला होता. यावर भाजपाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनीदेखील चांगलेच प्रत्युत्तर दिल्याचं दिसून येत आहे.