लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून, सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. शिरूरमधील विद्यमान खासदार आणि उमेदवार अमोल कोल्हे यांना मतदारसंघात प्रचार करताना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय, गावकरी त्यांना जाब विचारतायत, यावरून आता शिवाजी आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात जुंपलीय.