लोकसभा निवडणुकीचे टप्पे जस जसे पुढे सरकत आहेत. तस तसे राजकीय वातावरण आणखी तापताना दिसत आहे. बारामतीत मोठी लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता थेट शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागत आहेत. त्यावर शरद पवार गटातील आमदार रोहित पवारही जशास तसं उत्तर देताना दिसत आहेत. आता अजितदादांना सोसाटीत जाऊन प्रचार करावा लागतो, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. रविवारी (२८ एप्रिल) कोल्हापूरात ते बोलत होते.