भाजपाला मत म्हणजे विनाशाला मत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी काल (२८ एप्रिल) रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या सभेत बोलताना केली. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदीजींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतोय. तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा असं आव्हानही फडणवीसांनी ठाकरेंना दिलं.