सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरांच्या नामांतराची लाटच आली आहे. उस्मानाबाद, औरंगाबाद पाठोपाठ आता अलिबागच्याही नामांतराचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अलिबागचे नाव ‘मायनाक नगरी’ करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अलिबाग नाव आणि त्यामागचा इतिहास सध्या चर्चेत आहे.