लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने प्रचार संभाचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही महाराष्ट्रात सलग तीन ते चार सभा घेत आहेत. मात्र या सगळ्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं जात नाही आहे. या संदर्भात पत्रकारांनी मनोज जरांगे पाटलांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी उभ्या आयुष्यात स्वतःचं चिन्ह सोडून दुसऱ्याचा प्रचार केला नाही. मात्र भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी मोदींवर ही वाईट वेळ आणली, असा टोला यावेळी जरांगेंनी लगावला.