उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारमतीमधील कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असल्याची सध्या चर्चा आहे. त्यावर आज पुण्यात अजित पवार यांना पत्रकरांनी प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज विरोधकांकडे कुठलाही मुद्दा राहिला नाही त्यामुळे आमच्याबद्दल गैरसमज पसरवला जात आहे, असं स्पष्टीकरण यावेळी अजित पवारांनी दिलं.