पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नाशिकच्या दिंडोरी येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी नाशिकच्या जागेसंदर्भात नेमकी काय चर्चा झाली, उमेदवारीचा तिढा सुटला का? याबाबत बावनकुळेंनी भूमिका स्पष्ट केली आहे.