येथे क्लिक करा : https://www.loksa.in/bsISld
१ मे म्हणजे महाराष्ट्र दिन. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अनेक दिग्गज नेत्यांनी सहभाग घेतला होता. त्यातीलच एक नाव म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी भारताच्या जडणघडणीत योगदान दिलंच, परंतु त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी त्यांनी घेतलेली भूमिकाही विसरून चालणार नाही. आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबांचे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र याविषयीचे विचार आणि योगदान काय होतं हे जाणून घेऊयात.