पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या प्रचार मैदानात उतरले आहेत. सोलापुरातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ हे आज (१ मे) सोलापुरात होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाष्य करत विरोधकांना लक्ष्य केलं. योगींची सभा अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. त्यावर लोकसत्ताचे प्रतिनिधी एजाजहुसेन मुजावर यांनी केलेलं हे विश्लेषण पाहा.