अबकी बार मोदी सरकार…अबकी बार श्रीरंग बारणे खासदार अशी स्वतःच म्हणण्याची वेळ बारणेंवर आली आहे. काल (१ मे) पिंपरीमध्ये आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी जाहीर सभा झाली. या सभेत आठवले यांच्या समोर उमेदवार श्रीरंग बारणेंनी भाषण करत ‘अबकी बार मोदी सरकार, अबकी बार अप्पा खासदार’ अशी घोषणा केली. यावेळी त्यांच्या घोषणेला विशेष असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.