सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस पक्ष आग्रही होता. मात्र विचार मंथन आणि बैठकांनंतर अखेर ही जागा ठाकरे गटाला मिळाली आणि चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे. हीच भावना काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी गुरुवारी (२ मे) चंद्रहार पाटील यांच्या प्रचार सभेत बोलून दाखवली.