नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (३ मे) आयोजित सभेसाठी केंद्रीय गृहमंत्री यांची रत्नागिरीत जाहीर सभा पार पडली. यावेळी अमित शाहांनी एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्याकडे बाळासाहेबांचा खरा वारसा आहे, अशी खोचक टीका केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तुमच्या फालतू, नकली सर्टिफिकेटची गरज नाही, असा प्रतिहल्ला केला. कणकवलीतील सभेतून उद्धव ठाकरे बोलत होते.