केंद्र सरकारने अखेर शुक्रवारी (३ मे) कांदा निर्यातीवरील बंदी हटविण्याचा निर्णय घेतला. कांदा निर्यातीवर आता ४० टक्के शुल्क लावून निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री तसंच अजित पवार आणि आपण मिळून सरकारला निर्यात बंदी हटवण्याची विनंती केली होती आणि त्याला प्रतिसाद मिळाला, असं फडणवीस म्हणाले.