विधानसभा निवडणुकीतील कौल धुडकावून उद्धव ठाकरे यांनी धोका दिल्याने तर, एकत्र येण्याचा प्रस्ताव स्वत:च देऊनही वेळकाढूपणा करणाऱ्या शरद पवार यांनी भाजपाशी लबाडी केल्याने या दोघांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशावरूनच धडा शिकवला, असं परखड प्रतिपादन मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना केलं. दरम्यान, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, लोकसभा निवडणुकीतील तिकीट वाटप, मुंबईसह राज्यातील राजकीय परिस्थिती आदी अनेक मुद्दयांवरही शेलार यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.