देशभरातील लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडत असून आज (५ मे) प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. या तिसर्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदार संघदेखील येत असून यंदा प्रथमच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे. या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं असून त्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी याबद्दल विशेष प्रतिक्रिया दिली आहे.