रत्नागिरी- सिधुदुर्ग मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (४ मे) जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी कोकणच्या विकासासाठी नारायण राणेंना निवडून देण्याचे आवाहन केले. या सभेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला पत्रकार परिषदेमधून उत्तर दिलंय.