माढा लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. या निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपाशी गद्दारी करून स्वतःसाठी मोठा खड्डा खाणला आहे. अशी जोरदार टीका भाजपाचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आज पंढरपुरात केली.