“आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे”, असे विधान राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उज्ज्वल निकम यांना भाजपाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान, वडेट्टीवारांच्या या वक्तव्यानंतर उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली