पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ डॉ. शशी थरूर यांचा ‘युवा संवाद कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉ.शशी थरूर हे उपस्थित युवकांशी इंग्लिशमध्ये संवाद साधत होते. त्यावेळी रविंद्र धंगेकर यांनी शशी थरूर यांना पुणेरी पगडी घालून सत्कार केल्यावर थरूर यांनी रविंद्र धंगेकर यांना बोलण्याचा आग्रह केला. त्यावर रविंद्र धंगेकर म्हणाले की, “शशी थरूर साहेब आपण पुण्यात आल्याचा मला विशेष आनंद होत आहे. तुम्ही देशासाठी जे काम करीत आहात ते जनतेला आणि युवकांना माहिती आहे. मुझे इंग्लिश नही आती लेकिन मैने मराठी मे बात की है, मैने क्या बात की, ये सब मेरी साथी आप को बाता देंगे”