लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने काही मतदारसंघात लक्षवेधी लढती पाहायला मिळत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढत. महायुतीचे शिवाजीराव अढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांच्यात चुरस रंगलेली पाहायला मिळणार आहे. गेला महिनाभर प्रचाराच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. मात्र मतदारसंघातील वारं नेमकं कोणाच्या बाजूने वाहत आहे? याबाबत लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी सुजित तांबडे यांनी केलेलं हे विश्लेषण पाहा…