बारामतीत आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पत्नी आणि आईसह मतदानाला आले होते. तेव्हा माझी आई माझ्यासोबत आहे, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. त्यावर त्यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पाटील यांनी टोला लगावला होता. त्यावर आता पुन्हा अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत भावालाच इशारा दिला आहे.