मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांच्यात थेट लढत होणार आहे. श्रीरंग बारणे यांना दोन वेळेस लोकसभा निवडणुकीत यश मिळालं आहे. यावेळेस त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांचं आव्हान असणार आहे. त्यामुळे यंदा मावळमधून बारणे तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार की मतदार वाघेरेंना संधी देणार? याबाबत लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी सुजित तांबडे यांनी केलेलं हे विश्लेषण पाहा.