बारामती मतदारसंघात मंगळवारी (७ मे) मतदान पार पडलं. मतदानानंतर सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आईची घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे एकच चर्चा रंगली होती. त्याबाबत पत्रकारांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्या प्रतिक्रिया देत म्हणाल्या की, ते अजित पवारांचं घर नाहीय. ते आशा काकी आणि पवार कुटुंबाचं घर आहे. तर घरच्यांचा आशीर्वाद मी प्रत्येत निवडणुकीत घेते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.