“बारामती लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी पैसे वाटपावरून विरोधक बिनबुडाचे आरोप करतायत, पराभव दिसत असल्याने हे आरोप होतायत, यात काही तथ्य नाही. बारामती लोकसभेतून राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवारच निवडून येतील, कोणी रडल काही झालं, तरी सुनेत्रा पवार पाच हजाराने का होईना निवडून येतील”, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केलाय. पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत जानकर बोलत होते.