शरद पवारांचा पराभव करणं हेच आमचं उद्दिष्ट हे चंद्रकांत पाटील यांचं विधान चुकीचं आहे. त्यांची चूक झाली हे मी मान्य करतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. जी व्यक्ती निवडणुकीत उभीच नाही त्याला तुम्ही पराभूत कारायचं म्हणता हे बरोबर नाही, असंही अजित पवार म्हणाले. पुण्यात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.