पुणे लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यावर भाजपा नेते हेमंत रासने यांनी निशाणा साधला आहे. “पुणे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आजवर झालेल्या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील. १३ महिन्यांपूर्वी रविंद्र धंगेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघात अपघाताने आमदार झाले. धंगेकर यांचं काम दाखवा आणि हजार रुपये मिळवा” असं म्हणत रासने यांनी रविंद्र धंगेकर यांना टोला लगावलाय.