पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांच्यासह काँग्रेसवर आर्थिक गैरव्यहाराचे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मागणी केली आहे की, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पंतप्रधानांचं, एका जबाबदर व्यक्तीचं हे वक्तव्य अधिकृत जबाब मानून या मनी लॉन्डरिंग प्रकरणाचा तपास करावा, तसेच अदाणींसह अंबानींना अटक करावी. राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.