शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये पडलेली फूट ही सर्वश्रुत आहे. अजित पवार यांनी जुलै २०२३ मध्ये महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष महाराष्ट्रात पाहण्यास मिळतो आहे. तसंच पक्षाचं नाव आणि चिन्ह हे देखील अजित पवारांना देण्यात आलं आहे. नुकतीच बारामतीची निवडणूकही पार पडली. अशात शरद पवारांचा मुलगा असतो तर असं म्हणत अजित पवारांनी त्यांच्या मनातली खंत शिरुरच्या सभेत बोलून दाखवली आहे.