राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. तर आतापर्यंत तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. शेवटच्या टप्प्यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाबरोबर सरकार स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या उमेदवारांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील १० पैकी पाच जागांवर शिंदे गटातील उमेदवार रिंगणात आहेत. हा टप्पा त्यांच्यासाठी कोणत्या कारणांमुळे आव्हानात्मक ठरू शकतो याबद्दल लोकसत्ताचे ठाणे ब्युरो हेड जयेश सामंत यांनी केलेलं हे विश्लेषण पाहा.