अमोल कोल्हे यांनी पत्राद्वारे विरोधक शिवाजी आढळराव यांची भैरवनाथ पतसंस्था तसेच पीडिसीसी बँकेबाहेर पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी पत्राद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. नौटंकी ढंगात कोल्हे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. मी कधी पतसंस्थेत राजकारण आणलं नाही. पतसंस्था ही जनतेच्या हितासाठी असल्याचं आढळराव म्हणाले. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.