पुलवामाचा जो हल्ला झाला, त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. त्यावर “पुलवामात जे घडलं त्याच्याबद्दल तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जे विस्तवासारखं असलेलं जे वास्तव जगासमोर मांडलं, त्याला कुणी उत्तर देऊ शकलेलं नाही” असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. सामनाने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली.