भाजप पुन्हा सत्तेवर आला तर २०२५ नंतर नरेंद्र मोदी नव्हे तर अमित शहा देशाचे नेतृत्व करतील. कारण भाजपमध्ये वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्त व्हावे, असा नियम आहे. या नियमानुसार मोदी पुढील वर्षी निवृत्त होतील. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे त्यांच्यासाठी नव्हे, तर त्यांचे उत्तराधिकारी अमित शहा यांच्यासाठी मते मागत आहेत, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी केला.