मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याच आधारावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. मत, नेते आणि गुंडांना विकत घेण्यासाठी महायुतीकडून जवळपास दोन हजार कोटी रुपये वापरतील आणि काही प्रमाणात वापरलेही आहेत, असं रोहित पवार म्हणाले.