मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात आम्हाला आनंद आहे. त्यांची लेकरं त्यांच्यासाठी एकत्र येत असतील तर आमचे लोक ही आमच्या मुलांसाठी एकत्र येतील.मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या पोलीस भरतीत दिलेलं दहा टक्के आरक्षण कुणाच्याही फायद्याचं झालेलं नाही. यामुळे मुलांचा वाटोळे झालं. समाजाला आवाहन करण्याची गरज नाही, त्यांचा मुलगा म्हणून मी आंदोलनाला बसत आहे, असं जरांगे पाटील म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते बोलत होते.