दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारासाठी आज (१५ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडत आहे. राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिंडोरी आणि त्यानंतर मुंबईत मोदींच्या सभांचा धडाका असणार आहे.