निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकसत्ता लोकसंवादमध्ये बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. आले तर स्वागत करायला हरकत नाही, असं सूचक विधानही यावेळी चव्हाण यांनी केलं.