पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य रोड शो बुधवारी (१५ मे) मुंबईत झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र यावेळी चर्चा रंगलेली ती अनुपस्थित असलेल्या अजित पवारांची. कल्याणमधील सभा असो किंवा रोड शो अजित पवार त्यावेळी नव्हते. त्यामुळे अजित पवार पुन्हा नाॅट रीचेबल झाले का? अशी चर्चा रंगली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे.