महाविकास आघाडीच्या उमेदवार डाॅ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची धुळ्यात सभा पार पडली. यावेळी शरद पवार यांचं भाषण सुरू असतानाच जोरात वादळ आलं. या वादळामुळे मंडपाला लावलेलं भलंमोठं बॅनरही पडलं. तेवढ्यात शरद पवार यांनी आपलं भाषणही आटोपत घेतलं.