मराठवाड्यातील काही मतदारसंघांत काहीसा परिणाम झाला. निवडणुकीच्या राजकारणातून जाती-जमातींमध्ये भांडणे होत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीय संघर्ष उभा राहात आहे, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकत आहेत. सामाजिक सलोखा बिघडविण्यात येत आहे, अशी चिंता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लोकसत्ता लोकसंवादमध्ये बोलताना व्यक्त केली.