आजपर्यंत या देशात कोणीही घेऊ शकलं नाही, असे धाडसी निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतले, त्याबाद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवं, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केलं आहे. तसेच महायुतीच्या व्यासपीठावरून त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर पाच अपेक्षा देखील व्यक्त केल्या. मुंबईतील शिवाजी पार्कवर शुक्रवारी (१७ मे) महायुतीची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.