दोन वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंचाहत्तर वर्षांचे होणार आहेत. त्यामुळे मोदी सेवानिवृती घेणार का? अशी चर्चा रंगली आहे. ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदींना फायदा न होणारी ही निवडणूक आहे. मोदी शब्दाचे पक्के आहेत. त्यामुळे ते नक्कीच ७५ वर्षांचे झाल्यानंतर निवृत होतील, असा खोचक टोला ठाकरेंनी लगावला आहे.