मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक दिली आहे. येत्या ४ जूनला अंतरवाली सराटी गावात जरांगे उपोषणाला बसणार आहेत. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, अशा विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसणार असून सहा जूनपर्यंत आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.