भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू आहे. येत्या चार जूनला निकालही जाहीर होतील. अनेकदा निवडणुकीच्या निमित्ताने ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत येतो. ईव्हीएम सुरक्षित आहे का? ते हॅक केलं जाऊ शकतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. या प्रश्नांची उत्तर मूळच्या धाराशिवच्या आणि आता बोस्टन येथे स्थायिक झालेल्या मराठी तंत्रज्ञ मंजिरी डंके यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे.