पुण्यात कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात प्रकरणी आता राजकीय वातावरणही तापलं आहे. खासदार संजय राऊत यांनी थेट पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. पोलीस आयुक्त नेमकं कोणाला मदत करत आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाल्यानंतर अनेकांकडून
संताप व्यक्त केला जात आहे.