Abhijit Bichukale: बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हे कल्याण लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. सोमवारी (२० मे) कल्याण लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आज अभिजित बिचुकले यांनी प्रतिक्रिया दिली असता ते म्हणाले की, मतदारसंघातील मतदार यादीतून ८० हजार मतदारांची नावं गायब झाल्याचं समोर आलं होतं. मतदानापासून ८० हजार मतदार वंचित आहेत त्यामुळे पुन्हा मतदान घ्या नाहीतर २७ मे पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा अभिजित बिचुकले यांनी दिला आहे.