सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक अशा राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या सुरू आहे. यावेळी उत्खनन करताना तेराव्या शतकातील यादवकालीनपूर्व शिवमंदिर या समाधीसमोर आढळल्याची माहिती समोर आली आहे. या शिव मंदिराची पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली आहे.