कल्याणीनगर येथील एका रोडवर तीन दिवसांपूर्वी भरधाव आलिशान पोर्शे कारने दोघा तरुणांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी हा अल्पवयीन आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (२२ मे) आरोपीच्या वडिलांना
पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते. त्यावेळी न्यायालयाबाहेर पोलिसांची गाडी येताच वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष सचिन जामगेंनी आरोपीवर शाई फेकली आणि घोषणा देत निषेध नोंदविला.