वाळूज परिसरामध्ये गुरुवारी (२३ मे) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सभा संपन्न झाली. सभेला संबोधिताना मनोज जरांगे पाटील यांनी चार जून रोजी पुन्हा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली. जोपर्यंत शासन निर्णयात सगेसोयरे उल्लेख समाविष्ट केला जात नाही. तोपर्यंत आता उपोषणातून माघार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी मराठा समाज बांधवांनी नेते मंडळींच्या पुढे पुढे करणं सोडावं असंही ठणकावून सांगितलं.