डोंबिवली ‘एमआयडीसी’तील ‘अमुदान’ या रसायन कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट होऊन त्यात आठ कामगार ठार, तर ६५ जखमी झाले. जखमींमध्ये शेजारच्या काही कंपन्यांतील कामगारांचाही समावेश आहे. स्फोटानंतर लागलेल्या आगीत कंपनी भस्मसात झाली. या स्फोटाने तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला. आज (२४ मे) दुसऱ्या दिवशीही एनडीआरएफचं बचावकार्य सुरू असून सकाळी ३ मृतदेहांना बाहेर काढण्यात आलं आहे.